सूर्याची ऊर्जा… तुमच्या प्रत्येक विजेच्या गरजेसाठी
गो ग्रीन, पैसे वाचवा!अखंड हरित ऊर्जेचे वचन!
घर, व्यवसाय आणि उद्योगासाठी सोलर पॉवर प्लांट, इन्व्हर्टर, बॅटरी आणि हरित ऊर्जा — सल्ला, डिझाइन, बसवणी, अनुदानाची कागदपत्रे आणि सर्व्हिस, सर्व एकाच टीमकडून. घरासाठी ₹78,000 पर्यंत सरकारी अनुदान.
खरेदीपूर्वी सर्व काही मोफत
प्रधानमंत्री सूर्यघर: मोफत वीज योजना
घराच्या छतावरील सोलरसाठी केंद्र सरकारचे अनुदान — बसवल्यानंतर थेट तुमच्या बँक खात्यात.
| 1 किलोवॅट | ₹30,000 |
| 2 किलोवॅट | ₹60,000 |
| 3 किलोवॅट व अधिक | ₹78,000 (कमाल) |
सोलर कॅल्क्युलेटर
तुमचे मासिक बिल टाका — सिस्टम साइज, अनुदान, EMI आणि बचत लगेच पहा.
घरगुती बिल महावितरण स्लॅब (ऊर्जा आकार + वहन आकार + स्थिर आकार + 16% वीज शुल्क) आणि नेट मीटरिंगनुसार. किमती अंदाजे; अचूक आकडे मोफत साइट सर्व्हेनंतर.
कारखाना, दुकान किंवा मोठ्या प्रकल्पासाठी? 10 kW पासून अनेक मेगावॅटपर्यंत व्यावसायिक आणि औद्योगिक सोलर प्रकल्प.
Solar projects completed
Home rooftop systems (3–7 kW)
Industrial plants up to 2 MW
Serving customers since
प्रश्नोत्तरे
घरावर सोलर पॅनल बसवायला किती खर्च येतो?
3 किलोवॅट सिस्टम साधारण ₹1.6–2 लाखांची असते. ₹78,000 अनुदानानंतर सुमारे ₹1–1.2 लाख लागतात, आणि EMI ची सोय आहे.
1 किलोवॅट सोलर किती युनिट वीज बनवतो?
महाराष्ट्रात वर्षाला सुमारे 1,500 युनिट, म्हणजे दररोज सुमारे 4 युनिट.
किती छत लागते?
प्रत्येक 1 किलोवॅटसाठी सुमारे 100 चौ. फूट सावली-रहित छत.
वीज गेल्यावर काय होते?
ग्रिड-टाय सिस्टम सुरक्षिततेसाठी बंद होते. बॅटरीसह हायब्रिड सिस्टम चालू राहते.
साइट सर्व्हे खरंच मोफत आहे का?
हो — बचतीची गणना, बिल विश्लेषण, सल्ला आणि इंजिनिअरची साइट भेट पूर्णपणे मोफत.

